Speculation about Rohit Sharma joining KKR went viral
esakal
Mumbai Indians reaction to Rohit Sharma trade rumours : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने संघबांधणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अंबानी यांच्या फ्रँचायझीला अपेक्षित संघ बांधता आला नाही. पण, आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी MI ने कंबर कसली आहे. पण, पुन्हा एकदा रोहित शर्मा भवती चर्चा येऊन थांबली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार केलं, तेव्हाही रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडतोय अशी चर्चा होती. आता रोहितचा खास मित्र अभिषेक नायर ( Abhishek Nayar) कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) कोच झाल्याने रोहित फ्रँचायझी बदलाची चर्चा रंगली आहे.