CSK vs LSG Live : उर्विल पटेलने झळकावले आयपीएलमधील वेगवान अर्धशतक; हात जोडले अन् खिशातून कागद काढला.. काय लिहिलं होतं?

Urvil Patel fastest fifty in IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज उर्विल पटेलने आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचत विक्रमी खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक झळकावत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.
urvil patel

urvil patel

Updated on

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: उर्विल पटेलने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील वेगवान अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील युवराज सिंगचा १२ चेंडूंत अर्धशतकाचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात हुकला. उर्विलने यशस्वी जैस्वालच्या ( १३) आयपीएलमधील वेगवान अर्धशतकाशी बरोबरी केली. आयपीएलच्या डावातील पहिल्या ८ चेंडूंत सहा षटकार खेचणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने ८ चेंडूंत नाबाद ४१ धावा केल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com