

Champions RCB Crush SRH
esakal
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Cricket News : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपणच चॅम्पियन असल्याच्या थाटात खेळ केला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यात त्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. RCB ने यापूर्वी SRH विरुद्ध सहा प्रयत्नांत केव्हाच १९० हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नव्हता, पण आज त्यांनी हा कटू इतिहास पुसून टाकला. देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal) व विराट कोहली ( Virat Kohli) यांची आक्रमक शतकी भागीदारी सामन्याला एकतर्फी करणारी ठरली.