IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

CSK Make Squad Change for IPL 2026 Playoff Battle: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६च्या निर्णायक टप्प्यापूर्वी संघात महत्त्वाचा बदल केला आहे. दुखापतग्रस्त रामकृष्णा घोषच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याची संघात एन्ट्री करण्यात आली आहे.
Chennai Super Kings have signed Karnataka all-rounder Macneil Noronha

Chennai Super Kings have signed Karnataka all-rounder Macneil Noronha

esakal

Updated on

Macneil Noronha Replaces Ramakrishna Ghosh: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफची शर्यत रंजक वळणावर आली असताना चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात बदल झाला आहे. CSK चा संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे आणि त्यांना उर्वरित ३ सामने जिंकून १८ गुणापर्यंत पोहोचणे, शक्य आहे. पण, त्यांच्या संघाला दुखापतींचा सामनाही करावा लागला आहे आणि काही खेळाडूंना स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागलेली आहे. अशात चेन्नईच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या खेळाडूने हवा केली आहे. CSK ने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला IPL 2026 च्या उर्वरित सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com