MI vs RCB rain threat in Raipur IPL 2026
esakal
Mumbai Indians qualification chances after washout: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली अपयश पाहावे लागत आहे. IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सला १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवता आले आहेत आणि ६ गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत. आता उर्वरित ४ सामने जिंकून ते १४ गुणांपर्यंतच पोहोचू शकतील आणि त्यानंतरही त्यांचे प्ले ऑफचे स्थान हे इतरांवर अवलंबून राहणार आहे. अशा परिस्थिती मुंबईसाठी उद्या गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. पण, या सामन्यापूर्वी रायपूरचे वातावरण बदलले आहे आणि मुंबईला कदाचीत मॅच न खेळताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो, अशी परिस्थिती आता दिसतेय.