

Nita Ambani’s candid reaction to Rohit Sharma’s youthful new look
esakal
Nita Ambani reaction to Rohit Sharma new look IPL 2026: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित फक्त वन डे क्रिकेट खेळतोय.. त्याला २०२७ चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि त्यासाठी तो कठोर परिश्रमही घेतोय... रोहितने त्याच्या फिटनेसवर भरपूर काम केले आहे आणि त्याला पाहून मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२६ च्या सरावाला सुरूवात केली. तेव्हा नीता अंबानी तेथे आल्या आणि सर्व खेळाडूंना भेटल्या.