Ben Stokes Gets Special Permission For IPL 2027 Auction Despite BCCI Eligibility Rule
esakal
Ben Stokes IPL 2027 auction eligibility controversy : इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स याने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या मिनी ऑक्शनसाठी नाव नोंदवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टोक्सचे २०२३ च्या पर्वानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा ३५ वर्षीय ऑल राऊंडर २ कोटींच्या बेस प्राईज खेळाडूंमध्ये आहे. पण, आयपीएल २०२५ च्या लिलावातून माघार घेणाऱ्या बेन स्टोक्सला मिनी ऑक्शनमध्ये सहभाग कसा घेता आला? कारण बीसीसीआयच्या नियमानुसार मेगा ऑक्शनमधून माघार घेणारा खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी अपात्र ठरतो... असे असूनही स्टोक्ससाठी बीसीसीआयने सतरंजी अंथरली.