MS Dhoni and CSK new coach discussion after Stephen Fleming exit
esakal
CSK new coach candidates Eoin Morgan Brendon McCullum Michael Hussey : पाचवेळा आयपीएल जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स, पुढील पर्वाच्या तयारीला लागला आहे. स्टीफन फ्लेमिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ते योग्य उमेदवार शोधत आहेत. या पदासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन, न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम यांची नावे चर्चेत आहेत. पण, भारताचे माजी क्रिकेटपटू व निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णमचारी श्रीकांत ( Kris Srikkanth) यांनी मॉर्गन व मॅक्युलम या दोन्ही नावांवर फुल्ली मारली आहे. CSK ने या दोघांचा विचार करण्यापेक्षा संघासोबत असलेल्या मायकल हसी यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.