IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

Mumbai Indians coaching staff changes ahead of IPL 2027: आयपीएल २०२७ च्या तयारीला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
Lasith Malinga leaves Mumbai Indians coaching setup

Lasith Malinga leaves Mumbai Indians coaching setup

Updated on: 

Lasith Malinga leaves Mumbai Indians coaching setup: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या याच्या भवितव्याची चर्चा सुरू असताना MI ने आज महत्त्वाचा निर्णय घेतला. इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या तयारीला सुरुवात होण्यापूर्वी संघाच्या कोचिंग सेटअपमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोणते चेहरे दिसतील याची उत्सुकता आहे. माहेला जयवर्धनेला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवून किरॉन पोलार्डकडे जबाबदारी दिल्यानंतर MI च्या ताफ्यात झालेला हा सर्वात मोठा निर्णय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com