IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

आयपीएल २०२७ साठी रिटेन्शन जाहीर झाले आहेत. अनेक मोठ्या खेळाडूंना संघांनी रिलीज केलं आहे. सर्व १० संघांनी कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी.
IPL 2027 retention

IPL 2027 retention

Sakal

Updated on: 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा २० वा हंगाम २०२७ मध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी १६ डिसेंबर रोजी आयपीएल लिलाव होणार आहे, त्याआधी १७ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना आगामी हंगामासाठी संघात कायम केलेल्या आणि संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. त्यानुसार आता सर्व संघांनी ही यादीत जाहीर केली आहे.

आयपीएल रिटेंशनपूर्वी काही महत्त्वाचे ट्रेडही झाले होते. रिषभ पंत कुलदीप यादवच्या बदल्यात लखनौ सुपर जायंट्समधून पुन्हा दिल्ली संघात ट्रेड झाला आहे. मोहम्मद शमी सॅम करनच्या बदल्यात लखनौमधून राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड झाला आहे, तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून पंजाब किंग्समध्ये ट्रेडमधून दाखल झाला आहे. अर्शदीप सिंगच्या बदल्यात हा ट्रेड दोन संघात झाला. यानंतर आता रिटेंशन जाहीर होताच अनेक आश्चर्यचकीत करणारे निर्णय समोर आले आहेत.

Loading content, please wait...