Rishabh Pant returns to Delhi Capitals in IPL 2027 trade
esakal
Kuldeep Yadav joins Lucknow Super Giants from Delhi Capitals: लखनौ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) अखेर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात परतला. आयपीएल इतिहासातील २७ कोटी घेणारा सर्वात महागडा खेळाडू रिषभला DC मध्ये परतण्यासाठी १२ कोटींचे नुकसान सहन करावे लागले. दिल्लीने १५ कोटींमध्ये त्याला LSG कडून आपल्याकडे घेतले, त्यासाठी त्यांनी कुलदीप यादवला १३.५ कोटींत लखनौकडे जाऊ दिले. रिषभच्या कामगिरीवर LSG चे मालक संजीव गोएंका फार खूश नव्हते आणि त्यामुळे आयपीएल २०२६ संपल्यानंतर रिषभने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता तो त्याने स्वतःहून घेतला होता की त्याला तो घ्यायला लावलेला? याबाबत शंका आहेच.