IPL 2027 Trade : चेन्नई सुपर किंग्स १३ कोटींच्या ऑल-राऊंडरसाठी मोठा डाव टाकणार, Hardik Pandya चा नाद सोडला; कोण आहे तो खेळाडू?

Chennai Super Kings target Rs 13 crore Liam Livingstone : आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या संभाव्य ट्रेडची चर्चा सुरू असतानाच आता चेन्नई सुपर किंग्सने महागड्या खेळाडूवर नजर ठेवल्याची बातमी समोर आली आहे.
IPL 2027 Trade: Hardik Pandya Trade Buzz Takes Backseat CSK Eye Rs 13 Crore SRH Star Liam Livingstone

IPL 2027 Trade: Hardik Pandya Trade Buzz Takes Backseat CSK Eye Rs 13 Crore SRH Star Liam Livingstone

esakal

Updated on: 

CSK planning major trade move ahead of IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याचा नाद सोडल्याचे दिसतेय... आयपीएल २०२६ च्या मध्यापासूनच हार्दिक CSK च्या ताफ्यात येतोय, अशी चर्चा रंगली होती. आयपीएल २०२७ पूर्वी हार्दिक पिवळ्या जर्सीत दिसेल, असे दावे केले गेले. पण, मुंबई इंडियन्सच्या या ऑल राऊंडरसाठी CSK च नव्हे, तर कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स अशा सहा फ्रँचायझींनी रस दाखवलेला दिसतोय. त्यात आता पंजाब किंग्सने ट्रेडमध्ये अचानक आघाडी घेतल्याचे दिसतेय आणि त्यामुळेच CSK ने आपला मोर्चा १३ कोटींच्या दुसऱ्या ऑल राऊंडरकडे वळवला आहे.

Loading content, please wait...