Yashasvi Jaiswal likely to leave Rajasthan Royals for Mumbai Indians
IPL 2027 Trade Deal Could Spring A Big Surprise: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२७ साठी ट्रेड विंडो खुली आहे आणि सर्व चर्चा मुंबई इंडियन्स संघाभवती फिरताना दिसत आहेत. रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पुन्हा जाईल अशी चर्चा... हार्दिक पांड्या संघ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा... तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा... असे सर्व असताना आता एक मोठा खेळाडू संघात दाखल होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. हार्दिकच्या जागी हा संघ MI च्या ताफ्यात येईल त्याला कर्णधारपद दिले जाण्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.