
Pace Bowlers in IPL Auction 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या लिलावात सोमवारी वेगवान गोलंदाजांना भाव मिळत असल्याचे दिसले. सुरुवातीला अनेक स्टार फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू अनसोल्ड राहिल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी मात्र भाव खाल्ला.
या लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वच फ्रँचायझींनी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फ्रँचायझी जपून पैसे वापरताना दिसले. त्यातही वेगवान गोलंदाजांसाठी मात्र फ्रँचायझींनी पैशांचा पेटारा उघडला होता.