Juhi Chawla Support Lalit Modi? KKR मालकाने ललित मोदीची 'री ओढली'; IPL वेळापत्रक बदलण्याची मागणी, नेमकं काय शिजतंय?

Lalit Modi proposes January start for Indian Premier League: आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार का? इंडियन प्रीमियर लीग एप्रिल-मेऐवजी जानेवारी महिन्यात खेळवण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलचे पहिले अध्यक्ष आणि स्पर्धेचे संस्थापक ललित मोदी यांनीच हा प्रस्ताव मांडला आहे.
Juhi Chawla demands IPL schedule change from April-May to January

Juhi Chawla demands IPL schedule change from April-May to January

esakal

Updated on: 

Juhi Chawla demands IPL schedule change from April-May to January: कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीची सह मालक जुही चावला हिने इंडियन प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकात बदलाचा प्रस्ताव ठेवला आहे. मार्च ते मे महिन्यातील प्रचंड उकाड्यात आयपीएल न खेळवता ती जानेवारीपासून सुरू व्हायला हवी, असे मत जुही चावलाने व्यक्त केले. "आयपीएलला आता क्रिकेटच्या वेळापत्रकात आपले स्थान शोधण्याची गरज नाही. त्यावर प्रभाव टाकण्याचा हक्क तिने मिळवला आहे,” असे तिने सोमवारी X वर पोस्ट केले. विशेष बाब म्हणजे आयपीएलचे पहिले अध्यक्ष ललित मोदीने आधी हा प्रस्ताव मांडला होता आणि आता जुही चावलाच्या रूपाने मोदीला किमान एक समर्थक मिळाला आहे.

Loading content, please wait...