

IPL Retention 2025 : शेवटी लखनौ सुपर जायंट्सने आगामी आयपीएल मेगा लिलावापूर्वी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आणि अपेक्षेप्रमाणे फ्रँचायझीने कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी LSG ने निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, आयूष बदोनी आणि मोहसिन खान यांना संघात कायम ठेवले. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि लोकेश राहुल यांचा तीन वर्षांचा सोबतीचा प्रवास इथेच संपला. त्याला कारण आयपीएल २०२४ दरम्यान सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर रंगलेला वाद ठरला. या सामन्यानंतर मालक संजीव गोएंका हे लोकेशला झापताना दिसले आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला होता.