IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket News: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ट्वेंटी-20 मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. अभिषेक शर्माने दमदार अर्धशतक झळकावत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या, परंतु आयर्लंडच्या गोलंदाजांनी सामना फिरवला.
India vs Ireland 1st T20I Ireland comeback

India vs Ireland 1st T20I Ireland comeback

esakal

Updated on

Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket Updates: श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून सुरुवात काही खास झाली नाही. फलंदाजीत तो अपयशी ठरला, परंतु संघानेही निराशाजनक कामगिरी केली. आयर्लंडच्या १८२ धावांचा पाठलाग करताना भारताच्या स्टार फलंदाजांनी खराब फटके खेचून विकेट फेकल्या. अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकानंतर बर्थ डे बॉय शिवम दुबे ( Shivam Dube) आणि अक्षर पटेल यांच्याकडून संघर्षाची अपेक्षा होती. पण, मुळचा भारतीय असलेल्या जय मुंद्राने ( Jai Moondra) करेक्ट कार्यक्रम केला, दोन महत्त्वाच्या विकेट घेत त्याने सामना फिरवला आणि आयर्लंडला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com