IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

CSK best playing XI IPL 2026 debate: इरफान पठाण याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला आहे. त्याने MS Dhoni ला आपल्या संघातून बाहेर ठेवत सर्फराज खानला सहाव्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे.
IRFAN PATHAN DROPS MS DHONI FROM CSK PLAYING XI FOR IPL 2026

IRFAN PATHAN DROPS MS DHONI FROM CSK PLAYING XI FOR IPL 2026

esakal

Updated on

Why Irfan Pathan dropped MS Dhoni from CSK XI? भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सच्या संभाव्या अंतिम ११ खेळाडूंची निवड केली आहे. हा संघ निवडताना त्याने CSK चा स्टार महेंद्रसिंग धोनी याला संघाबाहेर ठेवले आहे. धोनीचा १२ व्या खेळाडूसाठीही इरफानने विचार केलेला नाही. कॅप्टन कूलच्या जागी सहाव्या क्रमांकावर सर्फराज खानची निवड करून इरफानने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अतिरिक्त जबाबदारी घेतल्यास त्याचा विचार केला जाईल, असे इरफानने सुचवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com