Ajit Agarkar reacts to speculation on Shreyas Iyer replacing Rohit Sharma as Team India’s ODI captain.
esakal
Ajit Agarkar statement on Shreyas Iyer leadership role: आजच्या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत... सकाळी ११ च्या सुमारास बीसीसीआयने X पोस्ट केली अन् श्रेयस अय्यरने सहा महिन्यांसाठी रेड बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याचे जाहीर केले. पण, त्याचवेळी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी श्रेयसची भारत अ संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीही करण्यात आली. श्रेयसकडे वन डे संघाचे नेतृत्व सोपवून निवड समिती रोहित शर्माची ( Rohit Sharma) रिप्लेसमेंट त्यात पाहतंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडू लागला आहे. अजित आगरकरने त्यावर भाष्य केले आहे.