सूर्यकुमार यादव 'बाबा' होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; पत्नी देवीशाच्या 'त्या' व्हिडिओमुळे फॅन्समध्ये उत्सुकता

Devisha Shetty viral video sparks pregnancy rumours: भारताचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्याची मैदानावरील कामगिरी नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. सोशल मीडियावर त्याची पत्नी देविशा शेट्टी हिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Is Suryakumar Yadav going to become a father soon

Is Suryakumar Yadav going to become a father soon

esakal

Updated on

Is Suryakumar Yadav going to become a father soon? कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय ट्वेंटी-२० संघाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश पक्का केला. सूर्याची या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी तितकी चांगली झालेली नाही, परंतु त्याच्या नेतृत्वकौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. पण, त्याचवेळी सूर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देवीशा शेट्टी लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com