
भारताचा २६ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन दीड वर्षांपासून भारताच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे. पण असे असले तरी तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवताना दिसतोय. त्यामुळे त्याच्या कामगिरीने तो सातत्याने भारताचे दारही ठोठावताना दिसतोय.
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये आहे. याचवेळी ईशान देखील इंग्लंडमध्येच असून नॉटिंगघमशायरकडून काऊंटी क्रिकेट स्पर्धा खेळत आहे.