
Jharkhand vs Manipur Vijay Hazare Trophy 2024-25: विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ ही देशांतर्गत वनडे स्पर्धा पुढीलवर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी होत असल्याने महत्त्वाची मानली जात आहे. या स्पर्धेतील खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करताना दिसत आहेत.
नुकतेच इशान किशन हा देखील पुन्हा भारतीय संघाचे दार ठोठावताना दिसत आहे. तो या स्पर्धेत झारखंड संघाने नेतृत्व करत आहे. त्याने या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत खणखणीत शतक ठोकले असून संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे.