Ishan Kishan shattered MS Dhoni’s world record
Ishan Kishan Shines After Jharkhand’s SMAT Victory: इशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये हरयाना संघाचा पराभव करून झारखंडने पहिली SMAT ट्रॉफी नावावर केली. या सामन्यात इशानने ४९ चेंडूंत ६ चौकार व १० षटकारांसह १०१ धावांची वादळी खेळी केली आणि त्याच्या जोरावर झारखंडने २६२ धावांचा डोंगर उभा केला.किशनला या खेळीत कुमार कुशाग्रची साथ मिळाली. त्यानेही ३८ चेंडूंत ८१ धावांची खेळी करताना किशनसह १७७ धावांची भागीदारी केली.