
Maharashtra vs Services Vijay Hazare Trophy 2024-25 : भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी ही देशांतर्गत वनडे स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत महाराष्ट्र आणि सेनादल संघात सोमवारी (२३ डिसेंबर) सामना झाला.
मुंबईत झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने सेनालदलवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाडने वादळी शतक करत मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे.