Ishan Kishan | India vs New Zealand 1st T20I

Ishan Kishan | India vs New Zealand 1st T20I

Sakal

IND vs NZ: ७८५ दिवसांनी कमबॅक करणाऱ्या इशान किशनची चौकारानं सुरूवात, पण स्वस्तात झाला बाद; Video

Ishan Kishan Comeback: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात इशान किशनने ७८५ दिवसांनी पुनरागमन केले. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला, पण लवकरच बाद झाला. परंतु अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला.
Published on

भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० मालिकेला सुरूवात झाली असून पहिला सामना बुधवारी (२१ जानेवारी) सुरू झाला. नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असल्याने भारतीय संघ (Team India) प्रथम फलंदाजीला उतरला. भारताची सुरुवात खराब झाली, पण नंतर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आक्रमक फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला.

<div class="paragraphs"><p>Ishan Kishan | India vs New Zealand 1st T20I</p></div>
IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडने जिंकला टॉस! भारताच्या संघात इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-११
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com