
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या इंग्लंडचे मैदान गाजवत आहे. तो भारतीय संघाकडून खेळत नसला तरी इंग्लंडमध्ये त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे तो सध्या इंग्लंडची देशांतर्गत स्पर्धा काऊंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत नॉटिंगघमशायर संघाकडून खेळतोय.
तो चांगल्या फॉर्ममध्येही खेळतो. पण यासोबतच त्याचा अनोखा अवतारही सर्वांना पाहायला मिळाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.