
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (२३ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला होता. हैदराबादला झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.
याच सामन्यात सर्वांना चकीत करणारी एक घटना घडली होती. इशान किशनची विकेट वादग्रस्त ठरली होती, त्यावर बरीच चर्चा झाली. आता भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने म्हटले आहे की इशान किशनचे ब्रेनफेड झाले, त्याने किमान अंपायरच्या निर्णयाची तरी वाट पाहायला हवी होती.