Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

Ishan Kishan Double Century: दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्णधार ईशान किशनने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याचं त्रिशतक थोडक्यात हुकलं. पण त्याने अनेक विक्रम केले आहेत.
Duleep Trophy Final

Ishan Kishan Double Century

Sakal

Updated on

Ishan Kishan Double Century Records, Duleep Trophy Final : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच दुलीप ट्रॉफी दमदार कामगिरी करत अडीचशे धावांची खेळी करत इतिहास घडवला आहे. सध्या दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग (East Zone vs South Zone) संघांमध्ये चेन्नईत सुरू आहे.

या सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशने पहिल्याच डावात चांगली कामगिरी केली. त्याने कर्णधारपद सांभाळताना संघाला अंतिम सामन्यापर्यंत तर आणलंच, पण या स्पर्धेत त्याने फलंदाजी करतानाही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पूर्व विभागाने पहिल्याच डावात ७०० धावा पार केल्या.

Duleep Trophy Final
Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com