Ishan Kishan niggle controversy explained IND vs NZ 4th T20I
esakal
Ishan Kishan niggle controversy explained IND vs NZ 4th T20I : भारतीय संघाला चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या २१५ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ १८.४ षटकांत १६५ धावांत तंबूत परतला. भारताने मालिका आधीच जिंकली आहे आणि त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक फलंदाज कमी खेळवण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्याने फॉर्मात असलेल्या इशान किशनला बाकावर बसवले आणि अर्शदीप सिंगला खेळवले. पण, इशानला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का केले, याचे उत्तर देताना सूर्याने जे कारण सांगितले ते चुकीचे असल्याचा दावा होतोय. कारण, सामन्यात तसे चित्र पाहायला मिळाले आहे.