Ishan Kishan: 'हो, मी ब्रेक घेतला आणि...', अखेर इशान किशनने देशांतर्गत क्रिकेट न खेळण्यावर सोडलं मौन

Ishan Kishan On his Break: इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेण्याबाबत आणि पंत, सॅमसन अशा खेळाडूंबरोबरच्या स्पर्धेबाबत भाष्य केलं आहे.
Ishan Kishan
Ishan KishanX/BCCI

Ishan Kishan on competition with Pant, Samson: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याला भारतीय संघात संधी मिळत नसल्याने तो चर्चेत आहे. आता याबद्दल त्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर २०२३ मध्ये ऋषभ पंत आणि केएल राहुल दुखापतग्रस्त असताना इशान भारतीय संघासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती ठरला होता. त्याला कसोटी संघातही स्थान मिळाले होते. मात्र २०२३ च्या अखेरीस त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण होत गेले होते.

त्यातच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना मानसिक थकव्याचे कारण देत त्याने माघार घेतली होती. यादरम्यान, त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळणे अपेक्षित होते. मात्र, त्याने तसे न करता आयपीएलमध्ये तो सहभागी झाला. त्याचमुळे अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार शिस्तभंगाची कारवाई म्हणूनच त्याला बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारात स्थान दिले नाही.

आता त्याला भारतीय संघातही स्थान मिळवणे कठीण झाल्याचे दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्धही त्याला भारताच्या टी२० संघात स्थान मिळालेले नाही. त्यातच आता ऋषभ पंत, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, जितेश शर्मा असे यष्टीरक्षक फलंदाजही सज्ज असल्याने त्यांच्याशीही त्याला स्पर्धा करावी लागत आहे.

Ishan Kishan
IND vs ZIM: शतक करण्यासाठी अभिषेकला लकी ठरली शुभमन गिलची बॅट, सामन्यानंतर उलगडलं मोठं रहस्य

याबद्दल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना इशान म्हणाला, 'ऋषभ पंतला पुनरागमन करताना पाहून छान वाटतंय. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर आव्हानं आवडतात.'

'जेव्हा तुम्ही प्रतिभाशाली क्रिकेटपटूंबरोबर स्पर्धा करता, तेव्हा त्याचा फायदा तुमचा खेळ सुधारण्यासाठीच होतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही संधी मिळवता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी कमावलं आहे. हे सोपे नाही. पण मला वाटते स्पर्धा तुम्हाला समाधान देतात. मला त्याची मजा येते. मी याबाबत फार ताण घेत नाही.'

तसेच इशानने भविष्यात भारतासाठी कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळण्याची आशा असल्याचेही म्हटले आहे.

Ishan Kishan
Zim vs Ind : मॅच जिंकली तरी शुभमन गिल चिंतेत! वर्ल्ड कप विजेत्या संघातील 3 खेळाडू ताफ्यात सामील, आता कोण होणार बाहेर?

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विश्रांती घेण्याबद्दल इशान किशन म्हणाला, 'मी विश्रांती घेतली आणि मला वाटतं ते खूप सहाजिक होतं. एक नियम आहे की जर तुम्हाला पुनरागमन करायचं असेल, तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. ते खूप साधं आहे.'

'माझ्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे खूप वेगळे होते कारण सध्या त्याला काही अर्थ नव्हता. मी खेळण्याच्या स्थितीत नव्हतो आणि म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे आणि तुम्ही जाऊन देशांतर्गत क्रिकेट खेळत असाल, तर मग त्याला काय अर्थ आहे. असे असेल, तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळलो असतो.'

तो असंही म्हणाला, 'ते सर्व निराशाजनक होते. आज मला असं म्हणायचं नाहीये की सर्वकाही ठीक आहे. माझ्यासाठी ते सोपं नव्हतं. तुम्ही अनेक गोष्टींचा सामना करता. माझ्या डोक्यात हे काय झालं, का झालं, माझ्याच बरोबर का, अशा अनेक गोष्टींचा विचार येत होते. जेव्हा तुम्ही कामगिरी करता, त्याचवेळी अशा गोष्टी घडतात.'

याशिवाय इशान किशन असंही म्हणाला की आता तो पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. त्यानं म्हटलं आहे की तो त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे.

तसेच भूतकाळात घडलेल्या गोष्टींपेक्षा भविष्यावर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचेही त्याने म्हटले. त्यानं असंही म्हटलं की देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्याची तो वाट पाहतोय आणि त्याला झारखंड संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com