Ishan Kishan shattered MS Dhoni’s world record
Ajit Agarkar explains Ishan Kishan selection : इशान किशनने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताच्या संघात पुनरागमन केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात इशान किशनची निवड झाली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज इशान दोन वर्षांनी संघात परतला आहे. इशान शेवटचा २८ नोव्हेंबर २०२३ रोजी टीम इंडियाकडून खेळला होता. त्यानंतर, खराब शिस्तीमुळे इशानला भारतीय संघातून वगळण्यात आले, तर त्याचा केंद्रीय करारही रद्द करण्यात आला.