Ishan Kishan News: इशान किशन नोकरीला लागला! आयकार्ड घालून RBI च्या ऑफिसमध्ये पोहोचला; कोणत्या पदावर करणार काम?

Ishan Kishan resumes RBI Assistant Manager duties: भारतीय क्रिकेटपटू इशान किशन सध्या क्रिकेटपासून थोडा ब्रेक घेत असला तरी त्याने आपल्या दुसऱ्या जबाबदारीकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे. इशान किशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या पाटणा कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून पुन्हा रुजू झाल्याचे समोर आले आहे.
Ishan Kishan resumes RBI Assistant Manager duties

Ishan Kishan resumes RBI Assistant Manager duties

esakal

Updated on

Ishan Kishan joins RBI Patna office: भारतीय संघाचा स्टार फलंदाज इशान किशन सध्या वेगळ्या भूमिकेत दिसतोय... श्रीलंकेत दाखल झालेल्या भारताच्या कसोटी संघात इशानची निवड झालेली नाही आणि २३ ऑगस्टपर्यंत देशांतर्गत क्रिकेटलाही ब्रेक आहे. या कालावधीत इशान पाटनाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात आय कार्ड घालून पोहोचला आहे. तो RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) म्हणून रुजू झाला. क्रीडा कोट्यातून त्याची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com