Ishan Kishan smashes fastest fifty in India-Pakistan encounters
esakal
India Pakistan T20 World Cup match latest Marathi Update : अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर इशान किशनने ( Ishan Kishan Fifty) पसरलेल्या निराशेत आनंदाचा पाऊस पाडला. पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना इशानने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि भारत वि. पाकिस्तान लढतीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. इशानला आज नशीबाचीही साथ मिळाली, कारण सुरुवातीला जे उत्तुंग फटके खेचले, तिथे पाकिस्तानी क्षेत्ररक्षकच नव्हते. अन्यथा त्यालाही कमी धावांवर माघारी परतावे लागले होते.