Vaibhav Sooryavanshi: 'इशान भैय्याला वाटलं माझ्याबाबतीत तो रिस्क घेतोय, पण मी...' वैभवने दोन विकेट्स घेण्याबाबत केला मोठा खुलासा

दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने उत्तर विभागासाठी गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत तीन षटकांत ११ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्याबाबत वैभवने मोठा खुलासा केला आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

१५ वर्षांचा भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी काही दिवसांपूर्वी दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीसाठी नाही, तर त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभाग या संघात सामना झाला होता. या सामन्यात वैभवने २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने तीन षटकांत ११ धावांत २ विकेट्स अशी प्रभावी कामगिरी केली, ज्यामुळे उत्तर विभाग संघाला मदत झाली. हा सामना इशान किशन नेतृत्व करत असलेल्या उत्तर विभागाने एक डाव आणि २१० धावांनी जिंकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com