
भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये पुढच्यावर्षी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळवली जाणार आहे. सध्या या स्पर्धेसाठी युरोप विभागाची पात्रता फेरी सुरू आहे. या स्पर्धेसाठी तब्बल २० संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी जे संघ थेट पात्र ठरले नाही, अशा संघांना पात्रता फेरी खेळून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी असते.
सध्या युरोप विभागाची पात्रता स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत बुधवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बुधवारी इटलीच्या संघाने त्यांच्यापेक्षा बलाढ्य स्कॉटलंडला पराभवाचा धक्का दिला आहे.