भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या वन डे संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवले गेल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कसोटी व ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या रोहित शर्माकडे वन डे संघाचे कर्णधारपद होते, परंतु आता तेही गेले. निवड समिती प्रमुख अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निर्णयावर टीका होत आहे. काहींना हा रोहितचा अपमान वाटतोय आणि म्हणून हिटमॅनला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातोय.