Gautam Gambhir’s old remarks on Rohit Sharma’s captaincy resurface
esakal
Gautam Gambhir old video resurfaces on Rohit Sharma captaincy : भारतीय संघाचा निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला. रोहित शर्मा याच्या खांद्यावरून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली आणि ती २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवली गेली. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर टीम इंडियात खूप बदल झालेले पाहायला मिळत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी कसोटी व ट्वेंटी-२० क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांत युवा चेहरे दिसत आहेत. आता रोहितकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून गंभीर व आगरकर यांनी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत दिले आहेत.