टीम इंडिया वाचली... ऑस्ट्रेलिया संघात निवड न झालेल्या फलंदाजाने झळकावले २९ चेंडूंत शतक, मोडला AB de Villiers चा वर्ल्ड रेकॉर्ड

Fastest List A century in cricket history: ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगर्कने देशांतर्गत लिस्ट ‘ए’ सामन्यात केवळ २९ चेंडूंमध्ये शतक ठोकत एबी डी व्हिलियर्सचा जागतिक विक्रम मोडला.
JAKE FRASER-MCGURK SMASHES WORLD RECORD WITH 29-BALL CENTURY, BREAKS AB DE VILLIERS’ RECORD

JAKE FRASER-MCGURK SMASHES WORLD RECORD WITH 29-BALL CENTURY, BREAKS AB DE VILLIERS’ RECORD

esakal

Updated on

Australian batter Jake Fraser-McGurk fastest hundred video: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. १९ ऑक्टोबरपासून ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने नुकतेच त्यांचे संघ जाहीर केले आणि त्या संघात स्थान न मिळालेल्या युवा फलंदाजाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्कने लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम नावावर केला. २३ वर्षीय फलंदाजाने २९ चेंडूंत शतक झळकावून AB de Villiers चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com