

Jalaj Saxena - Ruturaj Gaikwad
Sakal
Jalaj Saxena 6 Wickets for Maharashtra vs Goa: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून महाराष्ट्र विरुद्ध गोवा संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना गुरुवारपासून (२२ जानेवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे (Maharashtra) वर्चस्व राहिल्याचे दिसले असून यात मोठे योगदान अनुभवी अष्टपैलू जलज सक्सेनाचे (Jalaj Saxena) राहिले. त्याने ६ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण गोव्याचा पहिला डाव ८२.१ षटकातच २०९ धावांवर संपला. जलज सक्सेनाच्या गोलंदाजीपुढे त्यांचा संघ ढेपाळताना दिसला.