Sarfaraz Khan smashes another Ranji Trophy century for Mumbai
esakal
Mumbai vs Hyderabad Ranji match Sarfaraz century: रणजी करंडक स्पर्धेच्या २०२५-२६ च्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आणि मुंबईच्या सर्फराज खान याने शतकी खेळी केली. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांना अपयश आल्यानंतर मुंबईचा डाव सर्फराज व कर्णधार सिद्धेश लाड यांनी सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. सर्फराजने या शतकासह निवड समितीला पुन्हा त्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे. पण, सध्याच्या टीम इंडियाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्फराजसाठी जागा रिक्त नाही. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.