
Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या दीड महिन्यापासून विश्रांतीवर आहे. पण आता या दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसातच भारतीय संघातील खेळाडूंची निवडही जाहीर होईल.
दरम्यान, याआधी जम्मू आणि काश्मीर व लखनौ सुपर जायंट्स संघातील युवा अष्टपैलू खेळाडू युधवीर सिंग आणि मुंबईचा फिरकीपटू हिमांशु सिंग यांना भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून बोलवण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, याबाबत अद्याप बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काश्मीरमधील के स्पोर्ट्स वॉचने दिलेल्या वृत्तानुसार २६ वर्षीय युधवीरच्या जवळच्या सुत्राने माहिती दिली आहे की त्याला १२ सप्टेंबरपर्यंत चेन्नईमध्ये पोहण्यास सांगितले आहे.