Ranji Trophy: जम्मू-काश्मीरने इतिहास घडवला, फायनलमध्ये रुबाबत एन्ट्री! कर्णधारानेही द्रविड, सचिन यांनाही न जमलेला केला पराक्रम

Jammu and Kashmir Reach Maiden Ranji Trophy 2026 Final: पारस डोगराच्या नेतृत्वात खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीर संघाने इतिहास घडवला आहे. जम्मू आणि काश्मीर संघ रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचला आहे. याशिवाय पारस डोगरानेही मोठा पराभक्रम केला आहे.
Jammu & Kashmir

Jammu & Kashmir

Sakal

Updated on

Jammu and Kashmir Beat Bengal in Ranji Trophy 2026 Semi-Final: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात असून नुकताच बुधवारी सकाळी जम्मू आणि काश्मीर संघाने इतिहास घडवला आहे.

पारस डोगराच्या (Paras Dogra) नेतृत्वात खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीर संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी बुधवारी उपांत्य फेरीच्या अखेरच्या दिवशी अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगाल संघाला ६ विकेट्सने पराभूत केले.

जम्मू आणि काश्मीरने (Jammu & Kashmir) पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जम्मू आणि काश्मीरने उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे कधी मजल मारली नव्हती. पण यंदाच्या हंगामात ते पहिल्यांदाच उपांत्य फेरी खेळले आणि विजयही मिळवला. त्यामुळे आता त्यांना पहिल्यांदाच अंतिम सामना (Ranji Trophy Final) खेळण्याची संधी मिळणार आहे.

<div class="paragraphs"><p>Jammu &amp; Kashmir</p></div>
Mohammad Shami चा रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये राडा! एकाच डावात ८ विकेट्स घेत निवडकर्त्यांना सडेतोड प्रत्युत्तर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com