Mohammad Shami चा रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये राडा! एकाच डावात ८ विकेट्स घेत निवडकर्त्यांना सडेतोड प्रत्युत्तर

Mohammad Shami 8 Wickets Haul: मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी सेमीफायनलमध्ये अफलातून कामगिरी करत एकाच डावात ८ विकेट्स घेतल्या. भारतीय संघातून बाहेर असलेल्या शमीने या कामगिरीने निवडकर्त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
Mohammad Shami 8 Wickets

Mohammad Shami 8 Wickets

Sakal

Updated on

Mohammad Shami 8 Wickets in Ranji Trophy Semi-Final: मोहम्मद शमी गेल्या वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. अनेकदा निवड समितीने त्याच्या तंदुरुस्तीचे कारण देत त्याला भारतील संघातून गेल्या काही महिन्यात दूर ठेवण्यात आले आहे, याबाबत त्याने स्वत: निराशाही व्यक्त केली होती. पण आता तो त्याच्या कामगिरीने त्याचा फिटनेस सिद्ध करताना दिसत आहे.

सध्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy) स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने सुरू आहे. या फेरीत बंगाल विरुद्ध जम्मू-काश्मीर (Bengal vs Jammu & Kashmir) सामना बंगाल क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने (Mohammad Shami) एकाच डावात तब्बल ८ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले.

<div class="paragraphs"><p>Mohammad Shami 8 Wickets</p></div>
Mohammed Shami : ७ सामन्यांत १६ विकेट्स! शमी कामगिरीतून गंभीर-आगरकर यांना देतोय उत्तर, तरीही तो झालाय नकोसा?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com