Ranji Trophy: मुंबईविरुद्धच्या विजयानंतर जम्मू-काश्मीरची BCCI कडे तक्रार; श्रेयस अय्यरच्या विकेटवरून झालेला वाद

Jammu and Kashmir lodge complaint to BCCI: जम्मू-काश्मीर संघाने बीसीसीआयकडे मुंबई विरुद्ध रणजी सामन्यात विजय मिळवल्यानंतर अधिकृत तक्रार नोंदवल्याच माहिती समोर आली आहे.
Jammu Kashmir Team
Jammu Kashmir TeamSakal
Updated on

Jammu-Kashmir Cricket Team: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत जम्मू-काश्मीरने मोठा उलटफेर केला. जम्मू-काश्मीर संघाने बलाढ्य मुंबई संघाला तीनच दिवसात ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.

अनेक स्टार खेळाडूंच्या उपस्थितही मुंबईला पराभवाचा धक्का बसला होता. दरम्यान, या सामन्यात जम्मू-काश्मीरच्या शानदार खेळासोबतच खराब अंपायरींगची बरीच चर्चा झाली. अंपायर्सने दिलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले.

बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे हा सामना झाला. या सामन्यानंतर जम्मू-काश्मीरने बीसीसीआकडे खराब कामगिरीबाबत अधिकृत तक्रार केल्याचे समजत आहे.

Jammu Kashmir Team
MUM vs JK Ranji Trophy: मुंबईचा संघ जम्मू-काश्मीरकडून शेवटचा केव्हा हरला होता? तेव्हा श्रेयस अय्यरने पदार्पण केले होते अन् आता...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com