
Ranji Trophy 2024-25 : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल हे आंतरराष्ट्रीय स्टार खेळत असलेला मुंबईचा संघ पराभवाच्या छायेत आहे. जम्मू काश्मीर ज्या संघातील अब्दुल समद सोडला, तर एकाही खेळाडूचं नाव ओळखीचं नाही. त्या जम्मूच्या संघाने मुंबईला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले आहे आणि विजयाच्या दिशेने कूच केली आहे. जम्मू-काश्मीरने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईवर मिळवलेला हा पहिला विजय नाही. यापूर्वी, त्यांनी श्रेयस अय्यरच्या पदार्पणाच्या लढतीत बाजी मारली होती.