

Jammu & Kashmir
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचे विजेतेपद पारस डोगराच्या नेतृत्वातील जम्मू-काश्मीर संघाने मिळवले आहे. हुबळी येथे २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान जम्मू-काश्मीरचा आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकविरुद्ध अंतिम सामना झाला, जो अनिर्णित राहिला. या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने शेवटच्या दिवशी (शनिवारी, २८ फेब्रुवारी) दुसरा डाव घोषित केला आणि विजेतेपदाचे सेलिब्रेशन केले.
या सामन्यात जम्मू-काश्मीरने (Jammu & Kashmir) पहिल्या डावात तब्बल २९१ धावांची आघाडी मिळवली होती. याच आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिल्यानं जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं. नियमानुसार सामना अनिर्णित राहिल्यात पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेते घोषित केले जाते.