
Australia vs India 3rd Test at Gabba: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू असून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवल्याचे दिसत आहे. पण भारताने फॉलोऑनचे संकट टाळले आहे.
चौथ्या दिवशीही या सामन्यात पावसाचा बराचवेळ व्यत्यय आला. अखेर चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा भारताने ९ बाद २५२ धावा केल्या होत्या. तरी ऑस्ट्रेलियाकडे १९३ धावांची आघाडी आहे.