
भारत आणि इंग्लंड संघात क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी आत्तापर्यंत प्रभावित केले आहे. त्यातही भारताचा वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहने कमालीची गोलंदाजी केली आहे. तो सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पण याचदरम्यान त्याचा एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे.