
भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून शुभमन गिलच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळालाही सुरुवात होणार आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील मोहिमेला भारत आणि इंग्लंड सुरुवात करणार आहेत.
या मालिकेच्या महिनाभरापूर्वी मे महिन्यात रोहित शर्माने आणि त्यापाठोपाठ विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती. रोहित भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदाची जागा रिकामी झाली होती. या जागेवर कोणाची नियुक्ती होणार, याची बरीच चर्चा झाली.