Jasprit Bumrah’s expensive over led to Mumbai Indians’ IPL 2025 exit : पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. मुंबईविरुद्धच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यर हा नायक ठरला, परंतु याआधी जॉश इंग्लिसने ६ चेंडूंत मुंबईच्या सर्व गोलंदाजांचे खच्चीकरण केले. त्याने जसप्रीत बुमराहच्या एका षटकात २० धावा चोपल्या आणि मुंबईच्या अन्य गोलंदाजांवर अप्रत्यक्ष दडपण निर्माण झाले. बुमराहने एलिमिनेटर सामन्यात एका षटकात पूर्ण मॅच फिरवली होती आणि कर्णधार हार्दिक पांड्या तेव्हा म्हणालेला की, 'जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा जस्सीला मदतीला बोलावतो. ' पण, काल बुमराहचा दिवस नव्हता.